बेळगाव - गोकाक रस्त्यावर बेळगावपासुन साधारण १० किमी अंतरावर श्री सिध्देश्वर महादेवाचे मंदिर एका शांत आणि निसर्गरम्य टेकडीवर वसले आहे. या मंदिरात आणि पुर्ण टेकडीवरच भरपूर मधमाशा आणि मधाची पोळी असल्याने थोडे सांभाळूनच वर चढावे लागते. येथे एकाच नारळाला तीन फांद्या फुटल्या असुन या चमत्काराला आणि माडाच्या झाडाला स्थानिक लोक ब्रह्मा, विष्णु आणि महेश असे संबोधतात. श्री सिध्देश्वर महादेव मंदिराची प्रवेशद्वार कमान नव्याने बांधलेली असुन या कमानीच्या समोरच उत्सवाच्या वेळेस महाप्रसाद करण्यासाठी बांधलेले चुल व महाप्रसाद करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी पहायला मिळतात. कमानी खालुन जाणाऱ्या पायऱ्या थेट महादेव मंदिरापर्यंत जातात. श्री सिध्देश्वर महादेव मंदिराच्या खालील बाजुस खूप मोठया प्रमाणावर मधमाश्यांची पोळी दिसतात. टेकडीवर एका कपारीतच शिवलिंग असणारा गाभारा असुन समोरील भागात मंदीराचा सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदीर परीसरात तीन समाधी मंदीरे असुन हा परिसर फिरण्यास एक तास पुरेसा होतो. -----------------सुरेश निंबाळकर

​सिध्देश्वर महादेव -कणबर्गी

जिल्हा - बेळगाव 
श्रेणी  - सोपी 
प्रकार - शिवमंदिर