संकेश्वर

शंकरलींग मठ - संकेश्वर शुंगेरीचे १६ वे पीठाचार्य श्री.विद्याशंकर भारती इ.स.१५५३ च्या सुमारास कांही निवडक शिष्यासह महायात्रेस निघाले. शुंगेरीहुन काशी व तेथून पुढे हिमालयात गेले. तेथे गोविंद भगवत पुज्यपादाचार्य यांची गुहा पाहण्यास गेले. ठरावीक दिवसांनी बाहेर न आल्यास तुमच्यापैकी एका शिष्यास गुरुस्थानी मानुन शुंगेरीस जाऊन मठपीठ चालविण्याची त्यांनी आज्ञा करून गुहेत प्रवेश केला. ठरावीक दिवसात देवगोसावी गुहेबाहेर न आल्यामुळे त्यांच्या अज्ञेनुसार आपल्यापाकी गुरुस्थान मानून शिष्यमंडळी शुंगेरीस परतली. दरम्यान विद्याशंकर भारती (देवगोसावी) गुहेतून बाहेर पडले. पण तेथे शिष्यमंडळी नसल्याने ते तडक शुंगेरीस निघाले. वाटेत तुंगभद्रा संगमावर कुडलगी येथे त्यांची आपल्या शिष्यांची गाठ पडली. तेथे त्यांना मठास येऊ देत नसल्याचा शुंगरीच्या स्वामींचा लेखी निरोप मिळाला. त्यामुळे ते कुडलगी येथेच ते मठपीठ स्थापून राहू लागले. श्री देवगोसावी कुडलगीला असताना तत्कालीन कोल्हापूरचा सोमवंशीय राजा कृष्णराय यांच्या आग्रहावरून ते करवीर क्षेत्री निघाले. वाटेत संकेश्वरच्या वायवेस ३ मैलावर असलेल्या वल्लभगड येथे सिद्धाच्या गुहेत मुक्कामास राहिले असता त्यांना संकेश्वर महास्थानी कल्मशनाशीनी (हिरण्यकेशी) नदीतीरी आराधन करुन रहाण्याचा माता पार्वती देविचा द्रुष्टांत झाला त्यामुळे ते वल्लभगडावर राहु लागले.

जिल्हा -बेळगाव  
श्रेणी  - सोपी 
प्रकार - शिवमंदिर