चापोरा किल्ला त्याच्या इतिहासाबरोबर गोव्यातील एक प्रमुख पर्यटक आकर्षण केंद्र म्हणुन प्रसिद्ध आहे. म्हापसा पासून अंदाजे 10 किमी असलेला हा किल्ला मराठ्यांपासून आपल्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी इ.स.1617 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. हा प्रदेश पोर्तुगीज आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला होता. आदिल शाह कारकिर्दीच्या नंतर पोर्तुगीजानी किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि १६१७ मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी पोर्तुगीजानी त्यात भूमिगत बोगदे बांधले. पोर्तुगीजानी १५०हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला पण पोर्तुगीजानी पुन्हा त्याच्यावर ताबा मिळवला.आज किल्ल्याचा अंतर्गत भाग पूर्ण उजाड झाला असला तरी आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या भुयारात शिरण्याची तोंडे आजही दिसून येतात.आज या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले असले तरी येथून निसर्गाचे अप्रतीम दर्शन होते. संभाजी महाराजांनी जिंकलेला आणि सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी !!!

चापोरा-गोवा 

जिल्हा - गोवा 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी किल्ला