चिलाणे

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गढी पाहुन रंजाणे येथील गढीवजा किल्ला पहायला जाताना बामणे-धामणे गाव ओलांडल्यावर चिलाने गाव येते. या गावातुन जाताना रस्त्यालगत असलेली एक छोटीशी दोन बुरुज असलेली काही प्रमाणात पडकी भिंत असलेली वास्तु आपले लक्ष वेधुन घेते व काही क्षण आपल्याला थांबण्यास भाग पाडते. रस्त्याच्या बाजुने दोन बुरुज व तटबंदी असणारी हि वास्तु म्हणजे दादासाहेब भोणे यांचा वाडा आहे. अगदी अलीकडच्या काळात बांधल्या गेलेल्या या वास्तुचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. आम्हाला काही काळ या वास्तुने थांबविल्याने मुद्दामच या वास्तुचा येथे उल्लेख करत आहे. जे आहे ते जतन करायचे नाही व उगीचच त्यासारखे काहीतरी बांधायचे असे या वास्तुबाबत सांगता येईल. किल्ल्यासारखी असणारी या वास्तुची संपुर्ण भिंत रस्त्यावरून दिसत असल्याने जवळ जाण्याची गरज भासत नाही. या वास्तुची चौकशी केली असता हा दादासाहेब भोणे यांचा अलीकडील काळात बांधलेला वाडा असल्याची माहिती मिळते. धुळे जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील चिलाने गावात सहजपणे दिसणारी किल्ल्यासारखी वास्तु म्हणुन या वास्तुची येथे नोंद घेत आहे इतकेच. -----------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - धुळे  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट